पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास दिवसेंदिवस पुढे सरकत आहे. पुणे पोलिसांनी शुक्रवारी या हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेला डॉ. दाभोलकरांची हत्या झालेल्या ठिकाणी नेले. पुण्यातल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन अंदुरेने डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची प्रत्यक्ष जागा दाखविली, अशी माहिती पोलिसांनी दिली. अंदुरे सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. 


सीबीआय आणि एटीएसने शनिवारी औरंगाबादमध्ये संयुक्तरित्या कारवाई करत  सचिन अंदुरेला ताब्यात घेतले होते. सचिन निराला बाजार येथील दुकानात गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला. तर सचिनच्या अटकेने धक्का बसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.