पुणे: अजित पवारांचा मुलगा पार्थ याचे पुण्याच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची आगामी निवडणूक लढवण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. थेट शरद पवार यांनीच पार्थ यांना उमेदवारी देण्यास प्रतिकुलता दर्शविली आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?, असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे पार्थ यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. 


पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.