कोल्हापूर: गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील नोकरभरतीस तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा पशू संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषदेत केली. विधानपरिषदमध्ये सतेज पाटील यांनी गोकुळमधील नोकरभरतीचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. 


या प्रकरणात 20 जून रोजी 2018 रोजी नोकरभरतीला स्थगिती दिली होती.  तरी जुलै महिन्यात 429 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली. यावरुन विरोधकांनी महादेव जानकरांना धारेवर धरले. तेव्हा सहकार आयुक्तांमार्फत दूध संघातील भ्रष्टाचार आणि नोकर भरती चौकशी सुरु आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकरभरतीच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देत असल्याची घोषणा केली.