पुणे: एकनाथ खडसे यांना पक्षातून बाजूला सारण्याचा डाव दिल्लीत रचण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये खडसे यांना दाबून ठेवण्याची ताकद नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वार्तालापात बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी म्हटले की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले असून, भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपमध्ये नाराजीची लाट; खडसे, पंकजा मुंडेपाठोपाठ 'या' नेत्याचे सूचक ट्विट


राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने एकनाथ खडसे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना संधी नाकारली होती. यानंतर एकनाथ ख़डसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचे काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसे झाले असते तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेने चाललाय, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला होता.  


'म्हणून पंकजा मुंडेंना तिकीट नाकारलं', चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कारण


तसेच खडसे यांनी आपल्याला काँग्रेसने विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिल्याचेही सांगितले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भातही भाष्य केले. खडसें यांच्यासारखा लोकनेता आमच्या पक्षात आला तर चांगलेच आहे, असे त्यांनी म्हटले.