कोल्हापूर: महाविकासआघाडीतील पक्षांना सध्या सरकार पडण्याची भीती वाटत आहे. या भीतीने सध्या त्यांना झोप लागत नाही. त्यासाठी सरकारमधील घटकांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले. ते रविवारी कोल्हापूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यातील भाजप मजबुत, रिकामटेकडे लोक फोडाफोडीच्या चर्चा करतायत'


यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून भाजप महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सध्या 'ऑपरेशन लोटस'मध्ये रस नसल्याचे स्पष्ट केले होते. सध्या आमचा फोकस कोरोना हाच असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले होते. 


'भाजपचे आमदार फुटू नयेत म्हणून वरिष्ठ त्यांना सत्ता परत येण्याचं लॉलीपॉप दाखवतायंत'


मागासवर्गीय आयोगाचे पुनर्वसन करणे गरजेचे


मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रिम कोर्टात अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारचे मागासवर्ग आयोगाच्या पुनर्गठणाकडे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून या आयोगाच्या कार्यालयाला कुलूप असणे दुर्दैवी आहे. राज्य सरकारचे हे दुर्लक्ष म्हणजे राज्यातील मागास जनतेची घोर प्रतारणा असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.