पुणे: देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात (मनसे) पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोशन नुरहसन शेख या व्यक्तीने मनसेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मनसेचे कार्यकर्ते बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवत अल्पसंख्याकांच्या घरात जबरदस्तीने घुसतात आणि त्यांचा छळ करत करतात, असे रोशन शेखर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता पोलीस काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (CAA)समर्थन केले होते. तसेच त्यांनी देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी मोहीम उघडली होती. यानंतर राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना शोधण्याची मोहीम सुरु केली आहे.


ठाण्यात पासपोर्टसह बांग्लादेशींचे वास्तव्य, मनसेने दिले पोलिसांच्या ताब्यात


याच प्रयत्नात शनिवारी पुण्याच्या धनकवडी परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीन जणांना ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीसही उपस्थित होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे तिघेही घुसखोर असल्याचे सांगत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण पोलीस चौकशीत हे तिघेजण भारतीय असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे मनसेच्या धडक मोहीमेचा फज्जा उडाला होता. 



'बांगलादेशींनो चालते व्हा', पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक


काही दिवसांपूर्वी ठाणे, विरार आणि बोरिवलीतही बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरु केले होते. मात्र, प्राथमिक चौकशीत हे लोक कोलकाता आणि ओदिशातून आल्याची माहिती समोर आली होती.