ठाणे : बांग्लादेशींना मनसे कार्यकर्त्यांनी पासपोर्टसह पकडले. शहरातील घोडबंदर येथील किंगकाँग नगरमध्ये दोन घरांमध्ये सापडले बांग्लादेशी नागरिक सापडले आहेत. त्याआधी काल अर्नाळ्यात २३ बांग्लादेशी नागरिक सापडले होते. मनसेने पाकिस्तान आणि बांग्लादेशी नागरिकांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.
#BreakingNews । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बांग्लादेशींविरोधात एल्गार पुकारलेला असताना ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चार बांग्लादेशींना पकडून पोलिसांच्या हवाली केले । त्यांच्याकडे बांग्लादेशचा पासपोर्ट सापडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलायhttps://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/5wU7eHL0Gj
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 13, 2020
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बांग्लादेशींविरोधात एल्गार पुकारलेला असताना ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चार बांग्लादेशींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. ठाण्यातल्या किंगकाँग नगरमध्ये चार बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन या बांग्लादेशींना पोलिसांच्या हवाली केले. पोलीस सध्या त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत असून त्यानंतर पुढची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
घोडबंदररोड किंगकोन्ग नगरमध्ये ५० बांग्लादेशी परिवार राहत असल्याची माहिती मिळताच मनसैनिकांनी शोध मोहीम सुरु केली. जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहिमेत दोन परिवार बांग्लादेशी असलयाचे आढळले. त्यांना कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याच परिसरात अन्य परिवारही बांगलादेशी असून त्यांचा शोध पोलिसांना घ्यावा, अशी माहिती जाधव यांनी दिली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्याशी संपर्क करून मानसैनिकनिन याना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
दरम्यान, देश पोखरणाऱ्या अनधिकृत पाकिस्तानी, बांग्लादेशीयांना हाकलून द्या, या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखील महामोर्चा काढला आणि गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली. अर्नाळा येथे काल बांग्लादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज ठाण्यातही बांग्लादेशी आढळून आले आहेत. मनसेचे ही मोहीम सुरुच राहिल, असा निर्धार मनसेचे अविनाश जाधव यांनी केला आहे.