अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: गेल्या तीन महिन्यांपासून अविश्रांत काम करणाऱ्या पोलीस दलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. तसेच पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुनश्च: लॉकडाऊन ही केवळ अफवा; CMO चे स्पष्टीकरण


यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, जवळपास तीन महिने झाले तुम्ही सतत ड्युटीवर आहात. गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम करण्यासाठी काही वेळ मिळतो. परंतु लॉकडाऊनच्या या काळात सतत तीन महिने झाले तुमचे काम सुरू आहे. हे अभिमानास्पद आहे. यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.

एक अर्थमंत्री या नात्याने तुम्ही केव्हाही मला तुमचा उत्साह वाढण्यासाठी एखादी गोष्ट सांगितली तर अशावेळी मी नेहमी तुमच्यासोबत असेन राहील. लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या सर्वांवर ही मोठी जबाबदारी आहे. लॉकडाऊनच्या काळात पुणे पोलिसांनी केलेले मदतकार्य खूप मोलाचे होते. पोलीस आयुक्तांनी ते सर्व मला दाखवले. कुणी बाहेरच्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे काम केले, आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या कुणी वाचवलं असेल. कुणी आजीच्या वाढदिवस साजरा केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आम्हा सर्वांना पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. स्कॉटलंड पोलिसानंतर महाराष्ट्र पोलिसांचा नंबर लागतो अस बोललं जाते. ते खरही आहे. लॉकडाऊनच्या काळातही तुम्ही अतिशय हिमतीने काम करीत आहात. सतत काम करून तुम्ही सिद्ध करून दाखवले.