पुणे : पुण्यात ताडीवाला रोड परिसरातील हॉटेल पंचरत्न समोरील एका तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तळमजल्यावर एक ऑफिस आहे. या ऑफिसला सकाळच्या सुमाराला आग लागल्याचं लक्षात आलं. आग लागल्याचं समजताच एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. कार्यालयातील लाकडी फर्निचरला आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. या इमारतीत विविध कार्यालयं आहेत.