पुणे: विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा अंदाज खासदार गिरीश बापट यांनी वर्तविला आहे. गिरीश बापट यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये ते एका फळ्यावर महायुतीच्या विजयाचा आकडा लिहताना दिसत आहेत. मतदान संपल्यानंतर आपण दरवेळी मताधिक्याचा अंदाज लिहून ठेवतो. त्यानुसार कसबा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या मताधिक्याचा आकड्यासह अंदाज फळ्यावर लिहून ठेवल्याचे बापट यांनी म्हटले आहे. 


विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत स्वत:ला किती मते मिळणार, याचा बापटांनी वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे यावेळीही बापटांचे भाकीत बरोबर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



यापूर्वी गिरीश बापट हेच कसबा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, ते आता खासदार झाल्याने यावेळी भाजपकडून महापौर मुक्ता टिळक यांनी संधी देण्यात आली होती. गेल्यावेळी पुण्यातील आठही जागांवर भाजपला विजय मिळाला होता. यंदाच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.