उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस, दोन ठिकाणी कोसळल्या दरड
जुन्नर तालुक्यातील मढ जवळील वेळ खिडिंत शनिवारी सायंकाळी दरड कोसळली.
हेमंत चापुडे, झी मिडीया, जुन्नर : नगर कल्याण मार्गावर जुन्नर तालुक्यातील मढ जवळील वेळ खिडिंत शनिवारी सायंकाळी दरड कोसळली. यामुळे याठिकाणी एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आंबेगाव तालुक्यातील कुशीरे खोऱ्यातही दरड कोसळण्याची घटना घडली समोर आली असून यामुळे 9 गावाचा संपर्क तुटला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पावसाची संततधार सुरु झाली आहे. पावसाचा वेग जास्त नसला तरी दरड कोसळल्यामुळे रात्रीचा प्रवास धोक्याचा होऊ नये यासाठी एक बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दिवसा दरड कोसळल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. वाहतुक मात्र एका बाजुने सुरु आहे. दरवर्षी माळशेज घाट आणि त्याजवळील असलेल्या या रस्त्यांवर दरड कोसळून वाहतुककोंडी होत असते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.