कोल्हापूर : राज्यात डोंबिवली, पुणे, अमरावती येथील महिला/मुलींवरील भयावह बलात्काराच्या घटना ताज्या असताना कोल्हापूरातून देखील धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरात पोलीसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरात पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला असून बलात्कारानंतर मुलगी गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील ही घटना आहे. राजेंद्र गणपती पाटील असे अत्याचार करणाऱ्या पोलिसाचे नाव असून, तो पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा रहिवासी आहे. 


संबधित पोलीस कर्मचारी मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.  आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेमुळे परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.