नाशिकचा पेच संपता संपेना! रिंगणात पुन्हा नवा उमेदवार? महायुती, मविआची धाकधुक वाढवणार
Loksabha Election 2024 Nashik Constituency: नाशिकच्या निवडणुकीमध्ये आधी महायुतीचा उमेदवार ठरवण्यावरुन उलट सुलट चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता दिवसोंदिवस चुरस वाढत असतानाच आता यामध्ये आणखीन एक भर पडली आहे.
Loksabha Election 2024 Nashik Constituency: नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान होणार असून महाराष्ट्रातील 5 व्या टप्प्यातील मतदानामधील 13 मतदारसंघामध्ये नाशिकचा समावेश आहे. नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. नाशिकमधून महायुतीचा उमेदवार निवडताना अनेक उलट-सुलट घडामोडी घडल्या. यानंतर अखेर शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाही केली आणि महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण या चर्चेवर पडदा पडला. एकीकडे हा सस्पेन्स संपला असताना आता पुन्हा एकदा नाशिकमधील निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. या नव्या ट्विस्टमुळे नाशिकची थेट लढत होणार नसून इथे पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल असं चित्र दिसत आहे.
मतं विभाजनाचा फटका कोणाला बसणार?
नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. असं असतानाच आज शिवसेनेतील नाराज विजय करंजकर सुद्धा अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे. विजय करंजकर हे आज नाशिकमधून अपक्ष अर्ज दाखल करतील. असं झालं तर उद्धव ठाकरे गटाबरोबरच महायुतीचंही टेन्शन वाढणार आहे. कार विजय करंजकर हे या मतदारसंघातील 2 प्रभावी अपक्ष उमेदवार असतील. त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हे ठामपणे सांगता येणार नाही.
वंचितकडून कोण रिंगणार?
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर नाराज झाले असून ते स्वबळावर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विजय करंजकरांना ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्याने ते महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारखी 6 मे
वाजे आणि करंजकरांबरोबरच महायुतीचे हेमंत गोडसेही या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याशिवा काही दिवसांपूर्वीच शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो अजूनही कायम आहे. त्यामुळेच या चौघांपैकी दोन्ही अपक्ष उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नाही तर निवडणूक नाशिककरांना पाच पैकी एक उमेदवार निवडावा लागणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, शिंदेंनी आणि ठाकरेंनी तिकीट नाकारलेला प्रत्येक एक अपक्ष उमेदवार आणि वंचितच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होईल असं सध्या चित्र दिसत आहे. नाशिकमध्ये मतदान 20 मे रोजी होत असल्याने अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 6 मे आहे.