पुणे: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कुस्तीचा अखेर निकाल लागला. पवारांनी ही कुस्ती मारत फडणवीसांना आपणच खरे पैलवान असल्याचे दाखवून दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. त्यामुळे महाराष्ट्रातून 'पवार पॅटर्न' संपवणार अशी गर्जना करणाऱ्यांना शरद पवारांनी चीतपट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण प्रचारात काँग्रेसकडून विशेष असे कष्ट घेण्यात आले नव्हते. परिणामी शरद पवार यांनीच विरोधकांच्या फळीचे एकहाती नेतृत्त्व केले होते. त्यासाठी शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावती प्रचार केला होता. साताऱ्यात भर पावसात शरद पवार यांनी घेतलेली सभा या प्रचाराचा उत्कर्षबिंदू ठरली होती. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण फिरल्याची चर्चा होती. अखेर आज निकालांमधून त्याची प्रचिती आली. 


पश्चिम महाराष्ट्रात यंदा अनेक लक्षवेधी लढती पाहायला मिळाल्या. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव केला. 


तर कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फडणवीस सरकारमधील मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचाही इंदापूरमधून पराभव झाला. याशिवाय, कोल्हापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने महायुतीला चांगलाच धक्का दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोल्हापूरमधील १० पैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदा शिवसेनेच्या पाच विद्यमान आमदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. तर भाजपलाही जत आणि शिराळा या दोन जागा गमवाव्या लागल्या. 


तसेच पश्चिम महाराष्ट्रातील लढाईत कायम केंद्रस्थानी असणाऱ्या बारामतीचा बालेकिल्ला अजित पवारांनी राखला. याठिकाणी अजित पवार यांनी आपल्या सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून दिमाखदार विजय मिळवला. भाजपने मोठा गाजावाजा करून मैदानात उतरवलेल्या गोपीचंद पडाळकर यांच्या आव्हानातील हवा अजितदादांनी पूर्णपणे काढून घेतली. 


पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:


जुन्नर- अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)
आंबेगाव- दिलीप-वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
खेड आळंदी- दिलीप मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर- अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड- राहुल कुल (भाजप)
इंदापूर- दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
पुरंदर- संजय जगताप (काँग्रेस)
भोर- संग्राम थोपले (काँग्रेस)
मावळ- सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस)
चिंचवड- लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरी- अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)


वडगाव शेरी- सुनील टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
भोसरी- महेश लांडगे (भाजप)
कोथरूड- चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला- भीमराव तापकीर (भाजप) 
पर्वती- माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर- चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कॅन्टोनमेंट- सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ- मुक्ता टिळक (भाजप)
अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डी- राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप) 
कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) 
श्रीरामपूर- लहुजी कानडे (काँग्रेस)
नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष)
शेवगाव- मोनिका राजले (भाजपा)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
पारनेर- निलेश लंके (कॉंग्रेस)
अहमदनगर शहर - संग्राम जगताप (कॉंग्रेस)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजपा)
कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) 


मोहोळ- यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस) 
करमाळा- संजय शिंदे (अपक्ष)
माढा- बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बार्शी- राजेंद्र राउत (अपक्ष)
मोहोळ- यशवंत माने (काँग्रेस)
सोलापूर शहर उत्तर- देशमुख श्रीरामप्पा (भाजपा)
सोलापूर शहर मध्य- प्रणिती शिंदे (काँग्रेस)
अक्कलकोट- सचीन कल्याणशेट्टी (भाजपा)  
सोलापूर दक्षिण- सुभार देखमुख (भाजपा)
पंढरपूर- भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
सांगोला- शहाजीबापू पाटील (शिवसेना)
माळशिरस- राम सातपुते (भाजपा) 
फलटण- दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई- मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोरेगाव- महेश शिंदे ( शिवसेना) 
माण- जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर- बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
पाटण- शंभुराजे देसाई (शिवसेना)
सातारा- शिवेंद्रराजे भोसले(भाजप)


चंदगड- राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
राधानगरी- अबिटकर आनंदराव (शिवसेना)
कागल- मुश्रीफ हसन मियालाल (कॉंग्रेस)
कोल्हापूर दक्षिण- रुतुराज पाटील (कॉंग्रेस)
करवीर-  पी.एन.पाटील (कॉंग्रेस)
कोल्हापूर उत्तर- चंद्रकांत जाधव (कॉंग्रेस)
शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)
हातकणंगले-राजू आवळे (कॉंग्रेस)
इचलकरंजी- प्रकाशआण्णा आवडे (अपक्ष)
शिरोळ- राजेंद्र पाटील (अपक्ष)
मिरज- सुरेश खाडे (भाजप)
सांगली- सुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिराळा- मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
पलूस-कडेगाव- विश्वजित कदम (काँग्रेस)
खानापूर- अनिलभाऊ बाबर (शिवसेना)
तासगाव-कवठे महांकाळ- सुमन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
जत- विक्रम सावंत (काँग्रेस)