पिंपरी-चिंचवड: फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सोलापूरचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना कोरोनाच्या भीतीने सांगवी पोलिसांनी सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश काळे यांनी एकच फ्लॅट अनेकांना विकल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात येऊन येथील विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या' मंत्र्यांनी कोरोना कक्षात जाऊन रुग्णांशी साधला संवाद

मात्र, पोलीस ठाण्यात आल्यानंतर राजेश काळे यांना खोकला आणि शिंका येत होत्या. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून दिले. तेव्हापासून राजेश काळे फरार आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. 

राजेश काळे यांना खूप खोकला आणि शिंका येत असल्याने आम्ही त्यांना वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अटक करण्याचे ठरवले. त्यामुळे पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देऊन आम्ही त्यांना सोडले, असा दावा  पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे यांनी केला होता. मात्र, यावरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्यता पडताळून पुढील कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले.


अबब! क्वारंटाईन सेंटरमधील 'हा' व्यक्ती एका दिवसात खातो ४० चपात्या, १० प्लेट भात


काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड अरुण गवळी याचाही पॅरोल कोरोनामुळे वाढवण्यात आला होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर अरुण गवळी मुंबईतील आपल्या घरातून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात आत्मसमर्णप करण्यासाठी गेला होता. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन तुरुंग प्रशासनाने त्याच्या पॅरोलमध्ये काही दिवसांची वाढ केली. आता अरुण गवळीला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी नागपूरपर्यंत जाण्यासाठी प्रवासाची रितसर परवानगी घेण्याच्या सूचना अरुण गवळीला देण्यात आल्या होत्या.