पुणे : समाजाने दूर केलेल्या तृतीय पंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. अनेक महानगरपालिकाही त्या त्या पालिका क्षेत्रात रहाणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी काही ना काही उपक्रम राबवित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्यातील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शहरातील तृतीय पंथीयांना ही दरमहा ३ हजार रुपये देण्याची पेन्शन योजना सुरू केली आहे. तृतीय पंथीयांना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे.


समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनमानावर दुरगामी सकारात्मक परिणाम करणारी ही तृतीयपंथी पेन्शन योजना असल्याचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितले आहे.