Crime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात घातला दगड; भररस्त्यात थरार
सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे.
Sangli Crime News : धावत्या ST बसला थांबवून ड्रायव्हरच्या डोक्यात दगड घालण्यात आला आहे. युपी बिहार नाही तर महाराष्ट्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. सांगली येथे भर रस्त्यात हा हाणामारीचा थरार रंगला होता. या घटनेत बस ड्रायव्हर (Aatack On ST Bus Driver)गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालायात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे (Sangli Crime News ).
सांगलीच्या इस्लामपूर येथील ताकारी रोडवर ही घटना घडली. चालत्या एसटी बसला थांबवून दोघा व्यक्तींनी ड्रायव्हरवर हल्ला केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोमवारी भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी राजू इनामदार आणि त्याचा अनोळखी साथीदार याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी चालक रामचंद्र पाटील आणि वाहक अजित कुंभार हे एसटी घेऊन इस्लामपुरातून कडेगाव कडे निघाले होते. यावेळी संशयित राजू आणि त्याचा साथीदार यांनी दुचाकीवरून येऊन एसटी बस थांबवले. संशयित राजू याने रस्त्यावरील दगड उचलून थेट रामचंद्र यांच्या डोक्यात मारला. ज्यामुळे रामचंद्र दगड लागून जागीच खुर्चीवर बेशुद्ध पडले.
जखमी पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये राजू इनामदार व अन्य एक असे दोघांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राजू याने रामचंद्र यांच्यावर हल्ला का केला याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, वैयक्तित वाद अथवा पूर्व वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बस मधील प्रवाशांनी केला व्हिडिओ रेकॉर्ड
ही घटना घडली तेव्हा बसमधून अनेक प्रवासी करत होते. बस अचानक रस्त्यात मध्येच थांबवल्याने प्रावसी गोंधळले. हल्लेखोरांनी बस थांबवून ड्रायव्हर हल्ला केल्याने प्रवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. प्रवाशांनी मोबाईलमध्ये या सर्व घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर एसटी महामंडळाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था करण्यात आली.