Shahrukh Khan Pathaan Movie Controversy : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचा 'पठाण' (Pathan Movie) हा चित्रपट परवा म्हणजेच 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला विरोध होत असून हा चित्रपट वादात सापडला आहे. एकीकडे या चित्रपटाची शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत तर दुसरीकडे या चित्रपटाला विरोधही वाढताना दिसथ आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी राज्याची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्येही (Pune Protest) मोठा गोंधळ झाला आहे. पुण्यामध्ये बजरंग दलाने या चित्रपटाला विरोध केला आहे. बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर फाडले आहेत.


पुण्यामध्ये झालं आंदोलन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे या चित्रपटाला विरोधही वाढताना दिसत आहे. आज पुण्यातील राहुल टॉकीज ()चित्रपटगृहाबाहेर लावण्यात आलेले 'पठाण' चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाकडून फाडण्यात आले. शाहरुख खानच्या काही चाहत्यांच्या एका ग्रुपने या चित्रपटगृहाबाहेर पठाणच्या स्वागतासाठी भल्या मोठ्या आकाराचं पोस्टर लावलं होतं. हे पोस्टर काढून टाकावं अशी मागणी या बजरंग दलाने टॉकीजच्या चालकांकडे करत त्यांना इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही पोस्टर काढण्यात न आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर फाडलं. राहुल टॉकीज चित्रपटगृहाबाहेर भगवे झेंडे घेऊन 'भारत माता की जय'च्या घोषणा देत पोस्टर फाडलं.


वाढवण्यात आला पोलीस बंदोबस्त


या आंदोलनानंतर या चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बजरंग दलाबरोबरच पतित पावन संघटनांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे. या चित्रपटामध्ये दिपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दिपिका आणि शाहरुखवर चित्रित करण्यात आलेल्या बेशरम रंग गाण्यामध्ये दिपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. मागील महिन्यामध्ये 'पठाण' चित्रपटामधील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झाल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर आपला आक्षेप नोंदवला होता. 'पठाण' चित्रपटामध्ये काही वादग्रस्त दृश्य आहेत, असं मिश्रा म्हटलं होतं. ही दृश्य काठून टाकली नाही तर 'पठाण' चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असंही मिश्रा म्हणाले होते.



इशाऱ्यानंतर सेन्सॉर बोर्डने दिला सल्ला


मिश्रा यांच्या इशाऱ्यानंतर सेन्सॉर बोर्डने 'पठाण'च्या निर्मात्यांना काही दृश्यांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. या निर्णयाचं मिश्रा यांनी स्वागत केलं होतं. 'पठाण' चित्रपटासंदर्भातील सेन्सॉर बोर्डाचा निर्णय कौतुकास्पद आहे. रील लाइफ रियल लाइफवर फार परिणाम करते. निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना याचं भान ठेवलं पाहिजे असंही मिश्रांनी म्हटलं होतं.