Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, `या` शहरांमधील भक्तांची फसवणूक...
Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत. यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.
Akkalkot Bhakt Niwas Online Booking Fraud : गेल्या काही वर्षांमध्ये सगळंच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे सायबर काइमच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) असो किंवा ऑनलाईन व्यवहार (Online transactions) असो ऑनलाइन फ्रॉडचे (Online Fraud) अनेक प्रकरण समोर आले आहेत. स्वामी समर्थ भक्तांनाही (Shree Swami Samarth) याचा फटका बसला आहे.
सोलापूरमधील (Solapur News) अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या (shree swami samarth akkalkot mandir) भाविकांना भक्तनिवासाच्या बुकिंगच्या नावे गंडा घातला जात असल्याचं समोर आलंय. मागील एका महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील (Mumbai, Navi Mumbai, Pune) भक्तांची फसवणूक झालीय.
इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाईन बुकिंग करणारे भक्त (swami bhatk) या सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Crime ) नाडले जात आहेत. अशाच प्रकारे रोज 20 ते 25 जणांच्या फसवणुकीच्या तक्रारी येत असल्याचंही व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय. याची तक्रार केली असता, आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. (shree swami samarth akkalkot mandir bhakta niwas swami bhatk Online Fraud Cyber Crime and Solapur News)
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्यामार्फत भक्तनिवास (shree swami samarth akkalkot mandir bhakta niwas) चालवलं जातं. मात्र, त्याचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ (Website) नाहीये. तरीदेखील सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक (Fraud) करतायत. त्यामुळे जर तुम्ही कधी अक्कलकोटला जाणार असाल तर अशाप्रकारच्या गोष्टीला बळी पडू नका.