पुणे: काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामधून विश्वजीत कदम थोडक्यात बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री पुण्यात ही घटना घडली. या अपघातामध्ये विश्वजीत कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. परंतु, सुदैवाने विश्वजीत कदम यांना काहीही झाले नाही. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी विश्वजीत कराडच्या दिशेने रवाना झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले विश्वजित कदम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगलीच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ अशा विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते कुणालाही पडलेली नाहीत. नोटाला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते दिली होती.