सतत ब्रा घातल्यानेही होतंय नुकसान; वापर टाळल्यास होतोय फायदा
जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.
मुंबई : किती नावडत असलं तरीही महिला ब्रा घालणं टाळत नाहीत. आजकाल वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि मटेरियलच्या ब्रा बाजारात उपलब्ध असतात. मात्र ऑफिसनंतर घरातंही ब्रा घालणं आरोग्यासाठी योग्य नाही. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की, रात्री झोपताना अंडरगार्मेंट्स काढून झोपलं पाहिजे. असं केल्याने त्वचा खुलेपणाने श्वास घेऊ शकते.
रात्री ब्रा घालून झोपल्याने रक्तवाहिन्यांवरही दबाव येतो. तर आज जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.
ब्रेस्टच्या स्नायूंना आराम
जेव्हा तुम्ही अधिक घट्ट ब्रा घालता तेव्हा रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. यामुळे स्नायूंवर दबाव पजतो. जेव्हा तुम्ही रात्री ब्रा काढून झोपता तेव्हा स्नायूंना आराम मिळण्यास मदत मिळते आणि तुम्हाला झोपंही चांगली लागते.
स्तनांचा आकार वाढत नाही
काही महिलांचं असं म्हणणं आहे की, ब्रा वापरल्याने स्तनांचा आकार वाढू लागतो. मुख्य म्हणजे स्तनांचा आकार एक वयापर्यंतच वाढतो. आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ब्रा घातल्यामुळे नव्हे तर स्तनांच्या पेक्टोरल स्नायूंमुळे स्तनांचा आकार वाढतो.
रक्तप्रवाह सुरळीत होतो
ब्रा सतत वापरल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडचण निर्माण होतो. ब्राचा संबंध हृदयविकाराशीही जोडला जातो. ब्रा घातल्याने नसा, रक्तवाहिन्यांवर दबाव येतो, त्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रकारे होऊ शकत नाही.
चांगली झोप येते
ज्यावेळी महिला ब्रा काढून झोपतात त्यावेळी त्यांना चांगली झोप येत असल्याचं समोर आलं आहे. ब्रा न घातल्याने स्तनांवर अतिरीक्त ताण येत नाही. जेणेकरून शांत झोप मिळण्यास मदत होते आणि हे आरोग्यासाठीही फायदेशीर असतं.