पिरीयड्स क्रॅम्प्स त्रास देतायत; `ही` योगासनं देतील आराम
मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योगासनं फायदेशीर ठरू शकतात.
मुंबई : मासिक पाळीच्या वेळी महिलांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरं जावं लागतं. यामध्ये महिलांना पाठदुखी, पोटदुखी यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेक महिला हा त्रास दूर करण्यासाठी विविध उपाय करतात. मात्र मासिक पाळीच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योगासनं फायदेशीर ठरू शकतात. हा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही ही योगसनं अवलंबू शकता.
ब्राह्मारी
हे आसन ताणतणाव आणि चिंता पासून आराम देते. मासिक पाळी दरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. हे मन आणि शरीराला आराम देण्याचं कार्य करतं.
मलासन
मलासन हे पिरीयड्स दरम्यान करणं चांगलं आहे. हे नितंब आणि मांडीचे अंतर्गत भाग उघडण्यास मदत होते. यामुळे शरीराला आराम मिळतो.
बद्ध कोनासन
हे आणखी एक चांगलं आसन आहे जे महिलांनी मासिक पाळीदरम्यान करणं फायदेशीर आहे. या आसनाने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. त्याचसोबत तणाव कमी होतो.
बलासन
बलासन हे एक एक विश्रांती देणारं आसन आहे. हे मासिक पाळीच्या त्रासापासून मुक्त होण्यास मदत करू शकतं. त्याचप्रमाणे पाठदुखीचा त्रासही दूर होतो. तसंच यामुळे मनाला आणि शरीराला आराम मिळतो.
सुप्त बद्ध कोनासन
सुप्त बधा कोनासन करण्यासाठी हळू हळू सराव करा. या आसन दरम्यान पाठीवर झोपणे आवश्यक आहे. हे करत असताना हळू हळू गुडघ्यापर्यंत वाकून घ्या. यामुळे कमर आणि कूल्हे यांना विश्रांती मिळते.