पत्नीच्या ‘या’ गोष्टीने चांगलं राहतं पतीचं हृदय!
पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.
पॅरिस : पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.
नुकताच एका अभ्यासातून खुलासा करण्यात आलाय की, ज्या पुरूषांचं वैवाहीक जीवन वेळेनुसार वाढत जातं आणि मजबूत होतं, त्यांच्या शरिरात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियमीत राहतं. ते लोक हेल्दी राहतात.
या अभ्यासातून या गोष्टीकडेही इशारा करण्यात आलाय की, रिलेशनशीप काऊन्सेलिंगचे आयोग्यदायी अनेक फायदेही असतात. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि ग्लॅसगोच्या अभ्यासकांनी ब्रिटेनच्या ६०० पेक्षा जास्त पुरुषांना आपल्या रिसर्चमध्ये सामिल करून घेतलं होतं. आणि त्यांच्या लग्नाच्या गुणवत्तेचं २ स्तरांवर मुल्यांकन केलं. पहिला टप्पा जेव्हा त्यांचं मुल ३ वर्षांचं होतं. आणि दुसरा टप्पा जेव्हा त्यांचं मुल ९ वर्षांचं होतं.
१२ वर्षांनी रिसर्च टीमने या अभ्यासात सामिल झालेल्या पुरुषांच्या आरोग्याची तपासणी केली. यानुसार सहभागींच्या ब्लड प्रेशर, हार्ट रेट, वजन, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरची तपासणी करण्यात आली आहे. हे ते फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे हृदय रोग होण्याची शक्यता असते. जर्नल ऑफ एपिडीमिऑलॉजी अॅण्ड कम्यूनिटी हेल्थमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, रिसर्च टीमने सांगितले की, ज्या पुरूषांचं वैवाहीक जीवन वेळेनुसार अधिक दृढ झालं होतं. त्यांचं वजन आणि कोलेस्ट्रॉल रिडींग हेल्दी होतं. तेच ज्या लोकांनी त्यांचं वैवाहीक जीवन बिघडत असल्याचं सांगितलं होतं. त्यांचं ब्लड प्रेशर बिघडलेलं होतं.
अभ्यासकांनी इशारा दिलाय की, त्यांचा हा अभ्यास केवळ अवलोकनाच्या आधारावर करण्यात आलाय. त्यामुळे असे शंभर टक्के म्हणता येत नाही की, चांगलं वैवाहीक जीवन असलं म्हणजे हॄदय चांगलं राहिलंच.
याआधीही करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये हे समोर आलंय की, जास्तकरून लग्न झालेल्या पुरुषांमध्ये हृदयाशी संबंधीत रोग म्हणजेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची शक्यता कमी असते.