मुंबई : अनियमित पीरियड्स अनेक महिलांची किंवा मुलींची समस्या असते. काही महिला ही समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार करतात. तर काही महिला यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात. घरगुती उपायांपैकी एक म्हणजे पपई खाणं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांचा असा समज असतो ती पपई खाल्ल्याने पीरियड्स लवकर येतात. किंवा पीरियड्स यायला उशीर झाला असेल तर पपईच्या सेवनाने पीरियड्स येतात. मात्र हे किती खरं आहे? चला तर मग जाणून घेऊया खरंच पपईच्या सेवानाने मासिक पाळी लवकर येते आणि येते तर कशी?


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, पपई खाल्ल्याने मासिक पाळी लवकर किंवा वेळेवर येऊ शकते. घरगुती उपाय म्हणून तुम्ही याचा समावेश करू शकता. यासाठी कच्ची पपई जास्त फायदेशीर आहे. 


पपईमध्ये आढळणारा लेटेक गर्भाशयात आकुंचन उत्तेजित करतो आणि मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत करू शकतो. पपईमध्ये असलेले कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोनला उत्तेजित करतात ज्यामुळे लवकर मासिक पाळी येऊ शकते. 


पीरियड्समध्ये पपईचं असं करा सेवन


पीरियड्समध्ये पपईचं सेवन तुम्ही कच्चं किंवा पिकलेलं असं दोन्ही पद्धतीने करू शकता. जर मासिक पाळीचं चक्र योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर तुम्ही एक कच्ची पपई खाऊ शकता किंवा याचा एक कप ज्यूस पिऊ शकता.


असं मानलं जातं की, पपईच्या हिटींग गुणधर्मामुळे, मासिक पाळी देखील वेळेवर येऊ शकते. त्यामुळे दिवसातून एकदा पपईचं सेवन करावं. तुम्हाला इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा जेणेकरून तुम्हाला इतर प्रकारची समस्या उद्भवू नये.