लग्न ठरल्यानंतर प्रत्येक मुलीने या ७ गोष्टी जरुर कराव्यात
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलून जाते. लग्नाची तयारी तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहते. मात्र लग्न ठरल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीने केल्याच पाहिजेत
मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलून जाते. लग्नाची तयारी तर शेवटच्या क्षणापर्यंत सुरुच राहते. मात्र लग्न ठरल्यानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुलीने केल्याच पाहिजेत
काय हवे त्याची एक लिस्ट बनवा - लग्नाची तयारी ही शेवटच्या क्षणापर्यंत होतच असते. त्यामुळे यासाठी एक नीट लिस्ट बनवा. काय करायचे आहे हे लिस्ट करा. त्या लिस्टनुसार कामे आवरा.
कुटुंबासोबत वेळ घालवा - हे काम तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर असले पाहिजे. लक्षात ठेवा, मुलगी कितीही मोठी झाली असली तरी तिच्या आई-वडिलांसाठी ती लहानच असते. त्यामुळे तुमच्या लग्नाबाबत सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर ते तुमचे आई-वडिल. त्यामुळे लग्नापर्यंतचा अधिकाधिक वेळ आई-वडिलांसोबत घालवा.
मित्र-परिवार - लग्नाच्या आधी मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टीचा आनंद जरुर घ्या. भरपूर मजा मस्ती करा. कारण हे दिवस परत येणार नाहीत त्यामुळे फुल ऑन मजा करा.
होणाऱ्या नवऱ्याला समजून घ्या - लग्न ठरल्यानंतर ते होण्यापर्यंतचा काळ हा सर्वात सुंदर काळ असतो. यादरम्यान होणाऱ्या नवऱ्याला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडीनिवडी, नात्याबाबत त्याच्या अपेक्षा हे सगळं समजून घ्या. भविष्याबाबत चर्चा करा.
आर्थिक स्वातंत्र्य - तुमचा फियान्स(होणारा नवरा) किती कमावतो यापेक्षा तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला महिला पुरुषांवर अवलंबून होत्या. मात्र आता चित्र बदललेय. त्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्यांबाबत दोघांनी चर्चा करणे तितकेच गरजेचे आहे.
बेसिक जेवण करता येणे गरजेचे - तुम्हाला जेवण बनवता येत असेल तर उत्तम. मात्र नसेल तर साधं जेवण तरी तुम्हाला बनवता आलं पाहिजे. जरी तुम्ही जेवणासाठी एखादा कूक ठेवला असेल आणि तो ऐनवेळी आला नाही तर पोटभरीचे काहीतरी बनवता आले पाहिजे.
सेक्सबद्दल माहिती असणे गरजेचे - याबाबत दोघांनाही माहिती असणं गरजेचे आहे.