४ वर्षाच्या चिमुकल्याचे हुंदके बोलतायत, आईचं असणं आणि नसणं
४ वर्षाच्या गेज नावा बालकाचंही असंच झालं, आईचं असणं आणि नसणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला गेजचे हे हुंदके ऐकल्यानंतर नक्की जाणवेल.
जयवंत पाटील, झी मीडिया मुंबई : आईसमोर असताना बालपण मधापेक्षाही गोड असतं. आईच्या कवेत असताना, आभाळा एवढी माया डोक्यावर असते. तेव्हा कशाचीच भीती आणि कमतरता वाटत नाही. मात्र आई नावाचं हे मायेचं आभाळ अचानक फाटल्यावर, ४ वर्षाच्या बालकाच्या मनावर आणि थेट काळजापर्यंत किती खोल खड्डा पडतो याची कल्पना, या चिमुकल्याच्या हुंदक्यांवरून येईल.
हुंदके बोलतायत...
४ वर्षाच्या गेज नावाच्या बालकाचंही असंच झालं, आईचं असणं आणि नसणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला गेजचे हे हुंदके ऐकल्यानंतर नक्की जाणवेल.
आईचं असणं आणि नसणं काय असतं?
गेजच्या काळजातही आई नसण्याचा खड्डा होता, आणि त्याच्या सावत्र आईन जेव्हा लग्नात शपथ घेतली, तेव्हा तो भरून निघतोय, असं या अवघ्या ४ वर्षाच्या मुलानं ऐकलं, आणि तो आपल्या आईला बिलगला. तेव्हा त्याचे हुंदके दाटून आले होते. हेच हुंदके सांगत होते, आई असणे आणि नसणे म्हणजे काय असतं.
हा व्हिडीओ कोणत्याही व्यावसायिक कॅमेऱ्याने शूट करण्यात आलेला नाही, तरीही देखील या कॅमेऱ्याने त्याचे हुंदक्याचं म्हणणं टिपलं आहे, लग्नाच्या धामधुमीत सर्वांना भावूक करणारा हा क्षण होता.
आईच्या बोलण्याकडे ४ वर्षाच्या चिमुकल्याचे कान
छोटा गेज सावत्र आईची शपथ ऐकल्यानंतर आईला बिलगला, कारण आई लिहान शपथेत म्हणाली होती, मी गेजला आपल्या सुरक्षेच्या कवेत ठेवीन, मी जे काही करेन ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल, हे वयानुसार तुला कळायला लागेल. जे सर्वोत्तम असेल तेच मी तुझ्यासाठी करत राहीन. तू माझ्यासाठी खूप खास मुलगा आहेस, त्यामुळे आय लव्ह यू गेज’
आई नावाचं गाव पुन्हा गजबजणार
कदाचित गेजला पुन्हा मायेची उब मिळेल, पुन्हा त्याचं ओसाड झालेलं, आई नावाचं गाव पुन्हा गजबजेल, त्याच्या आनंदाचा ठाव आईला घेता येईल, यापेक्षा जगात आनंदाची दुसरी गोष्ट तिच्यासाठीही नसेल. म्हणून गेजला हुंदका दाटलेला असताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
हा सर्वांना भावूक करणारा, हुंदक्यांची भाषा बोलणारा व्हिडीओ यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ परदेशातला आहे.