नवी दिल्ली : ग्रामीण भागात प्रत्येकी 10 इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये 3 महिला इंटरनेट वापरत असल्याचे पुढे आले आहे. अर्थात हे प्रमाण खूपच कमी असल्याचे अनेकांना वाटू शकते. पण, एकेकाळी शून्य किंवा केवळ एक असे प्रमाण असलेल्या ठिकाणी हा मोठा बदल आहे.


इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचा वाढतोय टक्का..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटच्या प्रचार, प्रसार आणि वापरांमुळे शहरांमध्ये नवी क्रांती झाली. अनेक सुखसोई वाढल्या, कामाना गती आली. अनेकांच्या स्वप्नांना नवे धुमारे फुटले.  ग्रामीण भागात नेमके याच्या उलट चित्र होते. पण, हे चित्र बदलत असल्याचे पुढे येत आहे. ग्रामिण भारतातही इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचा टक्का वाढताना दिसतोय.


गूगलने दिली माहिती


गूगलच्या दक्षिण पूर्व अशियाच्या प्रमुख सपना चढ्ढा यांनी ग्रामीण भारतातील महिलांच्या इंटरनेट वापराबाबत माहिती बुधवारी दिली. या माहितीत चढ्ढा यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण प्रत्येकी 10 इंटरनेट वापर कर्त्यांपाठीमागे 1 असे होते. पण, मधल्या काळात प्रचंड फरक पडला आहे. ग्रामिण भारतातही इंटरनेट वापरणाऱ्या महिलांचा टक्का वाढतो आहे. अर्थात याचा वेग फारच कमी आहे. पण, बदल होतो आहे हे महत्त्वाचे. गूगलकडील माहितीनुसा, भारतात इंटरनेट वापरणारांचे प्रमाण 40 कोटींहून अधिक आहे. ज्यात 33 कोटी लोक इंटरनेटचा वापर मोबाईलच्या माध्यमातून करतात, असेही चढ्ढा म्हणाल्या.


पुढे बोलताना चढ्ढा म्हणाल्या की, गुगल 'इंटरनेट साथी' कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना डिजिटल प्रणालीवर अधारीत आर्थिक कमाई करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. भारतामद्ये गूगल हा कार्यक्रम टाटा ट्रस्टच्या सहकार्याने करणार आहे.