केस गळतीवरील रामबाण उपाय
केसगळतीवर पुरूषांनी खालील उपचार केले तर त्यांना फायदा होईल, अर्थात यात खर्च तसा फारसा नाही.
मुंबई : केसगळतीवर पुरूषांनी खालील उपचार केले तर त्यांना फायदा होईल, अर्थात यात खर्च तसा फारसा नाही.
पहिला उपाय
एक मोठा कांदा घेऊन तो कापा. त्याचं मिश्रण करून वस्त्रगाळ करा, यानंतर हा कांद्याचा रसा केसांना लावा, केसांच्या मुळाजवळ लावा. पंधरा मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासांनी धुवून टाका.
रामबाण उपाय
कांद्यात सल्फरचे प्रमाण असल्याने, डोक्याला तसेच केसांच्या मुळाशी याचा फायदा होतो. हा प्रयोग फायदेशीर असल्याच्या भरपूर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. कांद्याचा रस हा केसगळतीवरील रामबाण उपाय मानला जातो, तसेच अनेकांना केस काही प्रमाणात उगवल्याचाही अनुभव आहे.
दुसरा उपाय
ज्येष्ठमध वाटून घ्या. त्यामध्ये थोडे दूध आणि केसर मिक्स करून त्याची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला लावा. सकाळी केस धूऊन टाका.
तिसरा उपाय
बदाम आणि खोबरेल तेल समप्रणामात घ्या. या मिश्रणाने केसांना मसाज करा. त्यानंतर काही काळाने केस धुवून टाका.
चौथा उपाय
मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण लावल्याने केसांना पोषण मिळते शिवाय केसांची उत्तम प्रकारे वाढ होते.