मुंबई: आजकाल बाजारात एकापेक्षा एक वरचढ असे अनेक परफ्युम उपलब्ध असतात. पण, यांमध्ये आवडता आणि तितकाच प्रभावी परफ्युम कसा निवडायचा? हा एक गुंताच. अनेकजण योग्य परफ्युम कसा निवडावा याबाबत संभ्रमात असतात. हा संभ्रम दूर होण्यासाठी आम्ही काही टीप्स आपल्याला सांगत आहोत. परफ्युम खरेदी करताना या टीप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल...


अधिक कॉन्सनट्रेट आणि लाँग लास्टिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांच्या मते परफ्युमच्या लेवलवर ईडीपी आणि ईडीटीचा उल्लेख केलेला असतो. तुमच्यासाठी ईडीपीवाला परफ्युम खरेदी करणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ईडीपीवाल परफ्युम अदिक कॉन्सन्ट्रेट आणि लॉन्ग लास्टींग असतो.


असा निवडा सुगंध


कोणत्याही प्रकारच्या सुगंधाचा परफ्युम निवडण्यापूर्वी तो एखाद्या छोट्या स्ट्रिपवर लाऊन तो हुंगून पाहा. त्यानंतरच तो आपल्या बॉडीला लावा आणि मग पाहा त्याचा दरवळ किती काळ राहतो. जर स्ट्रीपवरचा सुगंध ५ ते १० मिनिटांपर्यंत राहिला तर समजून जा की, तो परफ्युम तुमच्यासाठी योग्य आहे.


कॉफीच्या बियांचा वापर करा..


सुंगंधाची पडताळणी करण्यासाठी जात असताना कॉफीच्या बियाही सोबत ठेवा. कारण, अनेकदा वेगवेगळे सुगंध घेतल्यावर गोंधळ उडू शकतो की, कोणत्या परफ्युमचा सुगंध कोणता आहे. अशा वेळी कॉफीच्या बिया आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण, कॉफिच्या बिया तुमच्या वास घेण्याच्या शक्तीला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे तुम्ही एकापाठोपाठ ३ ते ४ सुगंध घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचा गोंधळही कमी होतो.


शरीराच्या विवीध अवयांचा वापर करा..


परफ्युमचा सुंगध ट्राय करण्यासाठी केवळ तो आपल्या मनगटावरच लाऊ नका. तर, शरीराच्या विविध अवयवांचाही वापर करा.


आपल्या आवडीला महत्त्व द्या


परफ्युमवर असलेल्या लेबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून तुमचे मत ठरवू नका. तुम्ही तुमच्या आवडीला प्राधान्य द्या. जो सुगंध तुम्हाला आवडेल तोच निवडा..