मुंबई : महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडूलिंबाची पाने अंघाळीच्या पानात टाकून अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात.


कोमट पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचेला आलेली खाज दूर होण्यास मदत होते, त्वचा निरोगी होते.


कडुलिंबाच्या पाण्यात औषधी तत्व आहेत, डोळ्याच्या आजूबाजूला त्रासदायक असणारे बॅक्टरीया या पाण्यामुळे आपोआप मारले जातात. डोळे निरोगी होण्यास मदत होते.


केसातील कोंडा दूर करण्यास ही अंघोळ फायदेशीर ठरते. डोक्यातील खाज दूर होते.


कडूलिंबाच्या पानात बॅक्टेरिया दूर होतात, त्यामुळे काखेतील बॅक्टोरिया मारले जातात, शरीराची दुर्गंधी दूर होते.


कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर जिभेवर कडवटपणा येतो, पण तो मुखदुर्गंधीला मारक असतो, म्हणून तो देखील फायदेशीर ठरतो.