ओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स
काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.
मुंबई : लिपस्टिक हा दैनंदिन मेकअपचा भाग झाला आहे. काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.
मात्र काही लहानशा चुकांमुळे तुम्ही लावलेली लिपिस्टिक लोकांना नकोशी वाटू शकते. यासाठी काही टीप्स आहेत आणि त्या पाळणे आवश्यक आहेत.
कोरड्या ओठांसाठी फॉर्म्यूला
कोरड्या ओठांवर घाई घाईने कधीच लिपस्टिक लावू नका, यासाठी आधी व्हॅसलिन लावा आणि मग लिपस्टिक लावा, तुमच्या ओठ आता सुंदर दिसतील.
लिपस्टिकची एक्स्पायरी डेट पाहा
लिपस्टिकलाही एक्स्पायरी डेट असते, तेव्हा जास्त जुनी लिपस्टिक तेवढी खुलत नाही, व्यवस्थित लूक हवा असेल तर जास्त जुनी लिपस्टिक लावणे टाळा.
मिसमॅच लिप लायनर
लिप लायनर ओठांचा आकार हायलाईट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. हे लिपलायनर लिपस्टिकला मॅच होणारे असेल, तर ओठ सुंदर दिसता. मात्र लिपस्टिक वेगळ्या रंगाची आणि लिप लायनर वेगळ्या रंगाचे असतील, तर मेकअपची वाट लागते, तेव्हा हे लिपलायनर खरेदी करताना काळजी घ्या.
लिपस्टिक सेट करा पण
लिपस्टिक ओठांना लावल्यानंतरओठ एकमेकांवर योग्य पद्धतीने फिरवावेत. अथवा टीश्यू पेपरने ओठांवर हलकासा दाब द्यावा. असं केल्याने लिपस्टिक चांगली लागते.
भडक लिपस्टिक जास्त नको
भडक आणि जास्त लिपस्टिक लावू नका, मेकअप करताना कोणतीही गोष्ट जास्त लावल्याने तुमचा लूक बिघडतो. प्रमाणापेक्षा जास्त लिपस्टिक लावली तर चेहरा विद्रूप दिसू शकतो. तेव्हा लिपस्टिकचं प्रमाण ठरवा.
दातांना लिपस्टिक लागू नये
लिपस्टिक लावून झाल्यावर आणि मेकअप झाल्यावरही एकदा योग्य पद्धतीने चेक करावे. कधीकधी घाईत मेकअप करताना लिपस्टिक दातांना लागण्याची शक्यता असते.