Menstrual Hygiene Day : पीरियड्सच्या दिवसात Vaginal area कसा स्वच्छ ठेवावा?
अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो की मेंस्ट्रुअल हायजीन म्हणजे नेमकं काय?
मुंबई : आज मेंस्ट्रुअल हायजीन दिवस आहे. स्त्रिला प्रत्येक महिन्याला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. यादरम्यान महिलांमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या माध्यमातून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी 28 मे हा दिवस मानला जातो.
मात्र अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो की मेंस्ट्रुअल हायजीन म्हणजे नेमकं काय? याचं उत्तर म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छतेची काळजी घेणं. मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक आजार होऊ शकतात.
मासिक पाळीच्या दिवसांत योनीमार्गाची स्वच्छता कशी ठेवावी?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांनी नेहमी योनिमार्ग नेहमी पुढील आणि मागील अशा दोन्ही बाजूने धुवावा. यावेळी योनी धुताना मागून पुढच्या बाजूला धुवून घ्यावा. असं न केल्यास, बॅक्टेरिया गर्भाशयातून ब्लॅडरमध्ये जाऊ शकतात. अशावेळी UTI चा संसर्ग होतो. त्यामुळे योग्य मार्गाने योनीमार्गाची स्वच्छता ठेवावी.
मासिक पाळी दरम्यान अशी स्वच्छता ठेवा
पिरियड्समध्ये रोज आंघोळ करा
दर 4 तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावा
योनी मार्ग 3-4 वेळा पाण्याने धुवा
साबण आणि फोमिंगचा वापर कमी करा
योनीमार्ग सतत ओला राहणार नाही याची काळजी घ्या
मासिक पाळी दरम्यान कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत?
दुपारच्या जेवणात मसूर, पनीर आणि उकडलेले अंडे यांचा समावेश करा
पोटात दुखत असल्यास किंवा क्रॅम्स येत असल्यास कोमट दूध पिणं फायदेशीर ठरेल
पिस्ता, टोमॅटो, ब्रोकोली यांसारख्या व्हिटॅमिन बी 6 असलेल्या गोष्टी खा