मुंबई : जगात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात, ज्या गोष्टी ऐकून आपल्यालाही धक्का बसतो. असंच एक प्रकरण अमेरिकेत पाहायला मिळालं. याठिकाणी एक 30 वर्षीय महिला तिच्या गर्भती असताना पुन्हा गर्भवती झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे तिने निरोगी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.


पहिले 3 गर्भपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, कारा विनहोल्ड असं या महिलेचं नाव आहे. ती गरोदर असतानाच पुन्हा गरोदर राहिली. विनहोल्डचे यापूर्वी 3 गर्भपात झाले होते. विनहोल्ड गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गरोदर राहिली. एका महिन्यानंतर, ती पुन्हा गरोदर राहिल्याचं समजताच ती फार खूश झाली.


सुपरफेटेशन कंडीशनमध्ये घडतात अशा घटना


या मेडिकल कंडीशनला सुपरफेटेशन असं म्हटलं जातं. यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनंतर, स्त्रीच्या अंड्यासह शुक्राणूंचं फलन त्याच गर्भाशयात होतं. 


हेल्थलाइनच्या मते, हे पहिल्याच्या काही दिवसात किंवा आठवड्यात होऊ शकतं. शेवटी, तिला 6 मिनिटांच्या फरकाने दोन मुलं झाली.


यावेळी काराने डॉक्टरांना विचारलं की नेमकं काय झालंय? यावर डॉक्टरांनी सांगितलं की, दोनदा ओव्हुलेशन झालं आणि दोघांनी वेगवेगळ्या वेळेच्या अंतराने अंड्याचे फलित झाली. गर्भधारणेदरम्यान जे काही घडलं तो एक चमत्कार होता यावर माझा 100% विश्वास असल्याचं काराने म्हटलंय.


2018 मध्ये विनहोल्डने एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर तिने पुन्हा आई होण्याचा विचार केला. मात्र त्यावेळी तिला गर्भपाताचा सामना करावा लागला. शेवटच्या गर्भपातावेळी विनहोल्डचा जीवंही जाण्याचा धोका होता. त्यामुळे अशा परिस्थितीत ती पुन्हा गरोदर राहण्याची तिच्या मनात भीती होती.