मुंबई : वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० वर्षानंतर शरीरात मोठे बदल होतात. सर्वाधिक परिणाम पचनक्रियेवर होतो. या वयात चेहऱ्याचे तेज कमी होऊ लागते. वजनही वाढू लागते. यामुळे वयाची तिशी ओलांडल्यानंतर आरोग्यकडे लक्ष देणे गरजेचे असते. 


स्वत:वर लक्ष केंद्रित करा. अनेकजण बऱ्याचदा दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात स्वत:कडे लक्ष देत नाही. मात्र वयाच्या तिशीनंतर स्वत:च्या गरजांकडेही लक्ष द्या. 


तुम्ही खुशाल भरपूर पैसे खर्च करा मात्र त्यासोबतच बचत करणे तितकेच गरजेचे आहे. तुमच्या कठीण काळात ही बचतच तुमच्या कामी येऊ शकते. पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.