COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबई नगरीत जेवढ्या वेगवेगळ्या प्रांतातील लोकं आली, तेवढीच येथील खाद्य संस्कृती अधिक प्रगल्भ होत गेली. मुंबईच्या सीएसटीस्टेशन बाहेर फोर्टकडे जाताना, पंचमपुरीवाला आहे.


पंचमपुरीला आता दीडशे पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं. पंचम हे ४० दिवसांनी आग्र्याहून चालत-चालत मुंबईला पोहोचले होते, पंचम म्हणजे सज्जन माणूस. पंचम यांनी येथे पुरी भाजीचं हॉटेल काढलं.


वेगवेगळ्या प्रकारच्या पुरी आणि भाजी हे येथील विशेष. मुंबईत एखाद्या खवैय्याने पंचमपुरी वाल्याकडच्या पुरींची चव चाखली नसेल, असा खवय्या सापडणे कठीण आहे. पंचमपुरीने आपली तिच ती चव कायम ठेवली आहे. मुंबईत कधी आलात तर एकदा पंचम पुरीला भेट द्या.