नीता अंबानींच्या रोजच्या जगण्यातील श्रीमंती
निता अंबानी.. श्रीमंत, देखणं, दिमाखदार, शाही, झगमगीत असंच त्यांचं जगणं..... घरी पाणी भरायला लक्ष्मी.... त्यामुळे कमी कशाचीच नाही
मुंबई : निता अंबानी.. श्रीमंत, देखणं, दिमाखदार, शाही, झगमगीत असंच त्यांचं जगणं, घरी पाणी भरायला लक्ष्मी, त्यामुळे कमी कशाचीच नाही. नीता अंबानींच्या दिवसाची सुरुवात होते. एक कप चहानं. हा चहाच असतो तब्बल ३ लाखांचा. त्यांनीच एका मुलाखतीत ही माहिती दिलीय.
आसाममधला अत्यंत महागडा चहा त्या पितात. तोही जपानमधून मागवण्यात आलेल्या कपामधून. जपानमधला सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड. 'नोरिटेक', नोटिरेकच्या कपातूनच त्या चहा घेतात. या चहाच्या कपाला सोन्याची बॉर्डर आहे. हा एक कप ३ लाखांचा आहे.
त्यांना घड्याळं, चपला, हँडबॅगच्याही शौकीन आहेत. त्यांच्याकडे बुल्गारी, कार्टिअर, राडो, गुची, केल्विन केलिन आणि फॉसिल यासारखे घड्याळाचे ब्रॅंड आहेत. यातल्या प्रत्येक घड्याळाची किंमत कित्येक लाखांच्या घऱात आहे. त्या एक चप्पल पुन्हा घालत नाहीत. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी, चू, पेलमोडा, मार्लिन या बड्या ब्रँडचे सॅंडल आणि शूज आहेत. नीता अंबानींची प्रत्येक हँडबॅग तीस ते चाळीस लाखांची असते.
नीता अंबानींनाही गॅझेटसचा जबरदस्त शौक आहे.सध्या त्या वापरत असलेल्या फोनची जोरदार चर्चा आहे. नीता अंबानी आयफोन कंपनीचा पिंक गोल्डचा फोन वापरतात. त्या फोनची किंमत एवढी आहे की त्यात चक्क एक जेट विमान खरेदी करता येईल. नीता अंबानी वापरत असलेल्या मोबाईल फोनची किंमत तब्बल 315 कोटी इतकी आहे.
निता अंबानींच्या रोजच्या जगण्यातल्या श्रीमंतीचे हे काही अंश ख-या अर्थानं लिव्ह लाईफ क्वीन साईज हे नीता अंबानींना शोभून दिसतं.