मुंबई : लिपस्टिकमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र काही महिला लिपस्टिक लावताना अशा चुका करतात ज्यामुळे त्या सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना खालील चुका करणे टाळा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. अनेकदा लहान ओठ असलेल्या मुली डार्क लिपस्टिक लावण्याला पसंती देतात. यामुळे ओठ अजूनच लहान दिसतात. त्यामुळे नेहमी लाईट कलरचा वापर करा. तसेच लिपस्टिक लावण्यासाठी लिपग्लॉस लावण्यास विसरु नका. 


२. लिपस्टिक घेताना पिवळा आणि ऑरेंज कलर निवडू नका. याशिवाय तुम्ही ब्राईट कलर वापरू शकता. सावळ्या मुलींवरही असे कलर छान दिसतात. 


३. लिपस्टिक लावण्याआधी आपल्या ओठांवर लिप बाम लावण्यास विसरु नका. यामुळे तुमचे ओठ अधिक स्मूद आणि सॉफ्ट होतील. याशिवाय लिपस्टिकही दीर्घकाळ ओठांवर राहील. 


४. लिपस्टिक लावल्यानंतर टिशू पेपर ओठांमध्ये दाबून धरा. यामुळे लिपस्टिकचा डाग इतर ठिकाणी लागणार नाही. 


५. लिपस्टिक खरेदी करताना नेहमी चांगल्या प्रतीची खरेदी करा. चांगल्या प्रतीची लिपस्टिक नसेल तर त्यामुळे ओठांवर रिअॅक्शन होऊ शकते.