Hormones संतुलित ठेवण्यासाठी ओट्सचं सेवन फायदेशीर?
ओट्सच्या सेवनाने खरंच Hormones संतुलित राहण्यास होते मदत? जाणून घ्या सत्य
मुंबई : शरीरात हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होत असेल तर अनेक समस्या आणि आजार होण्याची शक्यता वाढू लागते. शरीरात हार्मोन्स पातळीत कमी-जास्त प्रमाणात बदल होत असतील तर, शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही त्रास होऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
ब्रेकफास्ट हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग असतो, त्यामुळे आपण ब्रेकफास्टमध्ये कोणत्या पदार्श समावेश केला पाहिजे ज्यामुळे हार्मोन्स संतुलित करण्यास मदत होईल. पण कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
डोकेदुखी, मूड बदलणे तसेच पुरळ, अनियमित मासिक पाळी, नको असलेले केस, पीसीओएस, थायरॉईड, टेस्टोस्टेरॉन सारख्या शारीरिक समस्यांमुळे हार्मोन्स असंतुलित होतात. म्हणून ब्रेकफास्टमध्ये सकस आहार घ्यावा.
कोणते पदार्थ खाऊ नयेत
ब्रेकफास्टमध्ये साखर किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू खाणे टाळा, कारण ते हार्मोन्स असंतुलित होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. शिवाय ब्रेड, चीज, पोहे, उपमा किंवा सोडा इत्यादी कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा कारण यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
कोणते पदार्थ खावेत
हार्मोन्सचा समतोल साधायचा असेल तर बाजरीच्या पिठापासून बनवलेले डोसे-नारळाची चटणी किंवा घरी बनवलेले पोहे, उपमा, डोसा, ओट्स, हिरवी मूग डाळ, काळे हरभरे खावे.
हे सर्व पदार्थ गोष्टी हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम करतात. बेसन आणि पुदिना, कोथिंबीर चटणी, लसूण इत्यादी व्यतिरिक्त बदाम, बेदाणे, खजूर आणि सूर्यफूल किंवा भोपळ्याच्या बिया खाल्याने हार्मोन्स संतुलित राहतात.