`या` ड्रिंक्सचा ओव्हरडोस तुमच्या Vaginal Health साठी ठरतात धोकादायक!
शारीरिक तसंच मानसिक आरोग्याप्रमाणे वजानया म्हणजे योनीचं आरोग्यही (Vaginal Health) महत्त्वाचं. मात्र अनेक मुली त्यांच्या योनीच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.
Vaginal Health : शारीरिक तसंच मानसिक आरोग्याप्रमाणे वजानया म्हणजे योनीचं आरोग्यही महत्त्वाचं. मात्र अनेक मुली त्यांच्या योनीच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. योनीमार्गाचे आरोग्य म्हणजे केवळ स्वच्छता आणि सुरक्षित सेक्स इतकंच नाही. तुम्हाला माहितीये का, काही पदार्थ आहेत जे तुमच्या योनीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत.
कॉफीचा ओव्हरडोस
ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात कॉफीच्या सेवनामुळे योनीच्या बायोमला नुकसान पोहोचू शकतं. कॉफीमध्ये कॅफेन असल्याने अधिक प्रमाणात सेवनाने शरीराचा आणि योनीमार्गाचा पीएच खराब होतो. त्यामुळे कॉफीचा ओव्हरडोस करू नये.
चहाचं सेवन
कॉफीप्रमाणेच चहामध्ये देखील कॅफेनचं प्रमाण असतं. एनसीबीआयच्या मते, रेग्युलर टीमध्ये कॅफिनचं प्रमाण कमी असू शकतं. परंतु बाकी प्रकारच्या चहामध्ये कॅफेनचं प्रमाण 90 मिलीग्रामपर्यंत असण्याची शक्यता आहे. जास्त चहा प्यायल्याने डायरिया किंवा डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. याचा परिणाम योनीच्या आरोग्यावर होतो. यामुळे योनीमार्गात कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.
कोल्ड ड्रिंक किंवा सोडा
कोल्ड ड्रिंक्स, सोडा आणि इतर फ्रोझन ड्रिंक्स आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. पण तुम्हाला माहितीये का याचा परिणाम तुमच्या योनीमार्गावरही होतो. यामुळे तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचीही शक्यता असते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गोड पदार्थांच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि योनीचं आरोग्यंही बिघडू शकतं.