PCOS : पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम. या समस्येचे वाढते प्रमाण हल्लीच्या तरुणींमध्ये जास्त दिसते. हा आजार ज्नमत: नसून अनुवांशिक (Genetic) आणि हार्मोनल (Hormonal) असंतुलनामुळे निर्माण होणारी समस्या आहे. महिलांना ही समस्या सुरु होण्यापूर्वी काही लक्षणे (symptoms) सतत जाणवत असतात. (PCOS Ladies Are You Suffering From PCOS Know The Symptoms NZ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि वेळीच उपचार (remedy) घेत नाहीत. पण नंतर ही समस्या हाताच्या बाहेर गेल्यावर महिलांना जाग येते. तो पर्यंत उशीर झालेला असतो. आम्ही तुम्हाला पीसीओएस म्हणजे काय आणि त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत हे सांगणार आहोत.



PCOS म्हणजे काय?


स्त्रियांमध्ये दोन बीजांडकोष (ovary) असतात जे गर्भाशयाला जोडलेले असतात. पीसीओएसमध्ये महिलेच्या बीजांडकोषात स्त्रीबीज तयार होते. परंतु, हे बीज फुटत नसल्याने मासिक पाळी येत नाही. अशा स्थितीत ओव्हरीमध्ये छोट्या-छोट्या सिस्ट (गाठी) तयार होतात. वेळीच उपचार न केल्यास महिलेला गर्भधारण करण्यास अडचणी देखील येतात. 


PCOS ची लक्षणे -


1. अंडाशयाला सूज येणं (Swelling of the ovaries)
अंडाशयाला सूज आल्यामुळे अनेकदा तुमचे आोटी पोट दुखताना जाणवेल. 


2. परिपक्व बीज तयार न होणं (Failure to produce mature seeds)
महिलांच्या अंडाशयात प्रत्येक महिन्याला बीज तयार होत असते. पीसीओएस चा त्रास सुरु झाल्यास परिपक्व बीज तयार होत नाही.


आणखी वाचा - लग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या


3. अनियमित मासिक पाळी (Irregular menstrual periods)


महिलांना दर महिन्याला 4 ते 5 दिवस मासिक पाळी येते. जर तुम्ही या त्रासात असाल तर मासिक पाळी येण्याचे दिवस कमी होतात किंवा काही महिने मासिक पाळी येण्यास देखील बंद होते.



4. अंगावर व चेहऱ्यावर पुरळ (Rash on body and face)
पीसीओएसमुळे अंगावर व चेहऱ्यावर पुरळ येण्यास सुरुवात होते.


5.मधुमेहाची समस्या असणं (diabetes problem)
पीसीओएसमुळे मधुमेहाची समस्या देखील होऊ शकते. 


6. लठ्ठपणा (obesity)
तुम्हाला दिवसा लठ्ठपणा जाणवतो. काम करण्यात मन रमत नाही. तुमच्या दिवसाची सुरुवात तक्रारीपासून सुरु होते.


आणखी वाचा - Arranged Marriage करण्याआधी 'या' 5 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप अटळ 


वरीलप्रमाणे काही सगळ्याच महिलांमध्ये दिसणारी सामान्य लक्षणे दिली आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे जाणवत असल्यास तुमच्या डॉक्टरकडून तातडीनं तपास करुन घ्या. जितकं दुर्लक्ष कराल त्याचा तुमच्या प्रकृतीवर फरक जाणवेल. हे लक्षात ठेवा... आरोग्यं धनसंपदा !!


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)