मुंबई : अननस अतिशय चवदार फळ असल्याने हे बहुतांश लोकांच्या आवडीचं फळ आहे. अननसाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. पाहूयात अननसाचे आरोग्याला होणारे फायदे. अननस बाहेरून काटेरी असले तरी त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. 


व्हिटॅमिन ‘सी’चे अधिक प्रमाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अननस या फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असते. एक वाटी अननसाच्या सेवनामुळे दररोज मिळणाऱ्या व्हिटॅमिनच्या प्रमाणापेक्षा 100 टक्के व्हिटॅमिन जास्त मिळते. व्हिटॅमिन ‘सी’मुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय याच्या सेवनाने कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या आजारांपासून संरक्षण होते.


त्वचा निरोगी राहते


अननसामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. निरोगी आणि कोमल त्वचेसाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. यामुळे त्वचा सुरकुतण्यापासून सुरक्षित राहते. शिवाय सूर्याच्या युव्ही किरणांमुळे त्वचेची होणारी हानी देखील होत नाही.


पचनास मदत 


अननस खाल्ल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. अननसामध्ये असलेले ब्रोमेलन तुमच्या शरीरात अमिनो अॅसिड तयार होण्यास प्रतिबंध करतं. अननसाचे सेवन केल्याने अपचन तसेच आळशीपणा या दोन्हीवरही मात करता येतो. शिवाय अननसाच्या सेवनाने मलावरोध रोखण्यास मदत होते.