एक सुंदर आयआरएस ऑफिसर आणि गायक...सोनल
सनदी अधिकारी जे कागदाच्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले असतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना कंटाळलेले असतात.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सनदी अधिकारी जे कागदाच्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले असतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना कंटाळलेले असतात, म्हणजेच थोडक्यात नेहमीच बोरिंग मूडमध्ये राहतात, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते साफ चुकीचं आहे.
कारण सोनल सोनकावडे या आयआरएस ऑफिसरने आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर, असं काही नसतं असं दाखवून दिलं आहे. सोनल सोनकावडे या एक उत्तम गायक आहेत, नुसत्या गायक आहेत, यावरच त्या थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी काही अल्बममध्ये गायलंय आणि कामंही केलं आहे आणि रसिकांनी त्यांना दाद दिली आहे. 'मोरे सावरे' नावाचा त्यांचा अल्बम चांगलाच हिट झाला आहे.
सोनल सोनकावडे या फक्त सुंदर दिसणाऱ्या अधिकारीच नाहीत, तर त्या सुंदर गातात, अल्बमध्ये अभिनय करतात. एवढंच नाही तर सामाजिक प्रश्नांवर त्या जागृतीतही त्या आघाडीवर आहेत. बेटी बचाव, अन्न वाचवण्यावर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर एका व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.
सोनल सोनकावडे या एखाद्या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे गातातही, त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे. सध्या आयकर विभागात त्या कार्यरत आहेत.