मुंबई : चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या डाएटचा या समस्येवर मोठा उपाय असू शकतो. प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळ्या लोकांच्या शरीर आणि त्वचेवर वेगवेगळे रिअ‍ॅक्शन होतात. पण काही पदार्थ असे असतात जे प्रत्येकाच्या चेह-यावर पिंपल्स येण्याचे कारण बनतात. आज अशाच पाच पदार्थांबद्दल आपण जाणून घेऊया ज्यामुळे पिंपल्स येतात.


ब्रेड - ब्रेडमुळे चेह-यावर मोठ्या प्रमणात पिंपल्स येतात. यात ग्लूटेन असतं जे सिस्टेमिक इन्फ्लेमेशनचं कारण ठरतं. हे त्वचेवर पिंपल्स पसरवण्याचं काम करतं. 


बटाट्याचे वेफर्स - बटाट्याचे वेफर्सचा वापर क्विक स्नॅक्सच्या रूपात मोठ्या प्रमाणात केला जातो. पण फार कमी लोकांना हे माहिती आहे की, त्वचेवर पिंपल्स आणण्यात यांचा मोठा हात असतो. यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे पिंपल्स येतात. 


चॉकलेट - ताज्या शोधानुसार चॉकलेट खाल्ल्याने पिंपल्स होतात. चॉकलेटमध्ये असलेल्या शुगरमुळे हे होतात. त्यामुळे जर तुम्हाला चेह-यावर पिंपल्स नको असतील तर चॉकलेट खाणे सोडा.


दूध - दूधामुळेही चेह-यावर पिंपल्स येतात. दूध आणि त्यापासून तयार होणारे उत्पादनं इन्सुलिनोजेनिक असतात. याचा अर्थ आपण जेव्हाही दूध पितो तेव्हा आपल्या शरिरात थोड्य़ा प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती होते. त्यामुळे पिंपल्स होतात. 


सोडा - सोडा हा आपल्या त्वचेच्या कोणत्याही फायद्याचा नाही. यात मोठ्या प्रमाणात फ्रक्टोज असतात, ते एकप्रकारचं शुगर असतं. त्वचेसाठी हे एकप्रकारे नुकसानदायक खाद्य आहे.