मुंबई : नवं वर्ष ही फक्त कॅलेंडरवरची बदललेली एक तारीख नसते. तर या नव्या वर्षात अनेक नव्या आशा, संकल्प साकारले जातात. मग त्याला थोडे प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या जवळच्या व्यक्तींना 'गिफ्ट्स' द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामानिमित्त एकत्र आलेले अनेक जण नकळत तुमच्या जीवनाचा हिस्सा बनून जातात. मग नव्या वर्षात तुमच्याकडून त्यांच्या जीवनात थोडा आनंद निर्माण करण्यासाठी 'ही' गिफ्ट्स नक्की देऊ शकता.  


कलरबुक  - 


कामाच्या ठिकाणी ताण नाही अशा व्यक्ती क्वचितच भेटतील. तुमच्या सहकार्‍यांवर ताणतणाव असेल तर तो थोडा हलका करण्यासाठी त्यांना मदत करा. अ‍ॅडल्ड कलरबुक त्यांना भेट म्हणून द्या. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल. 


एखादं झाडं 


तुमच्या मित्र-मैत्रिणींना निसर्गाची आवड असेल तर घरात किंवा ऑफिस टेबलवर ठेवण्यासाठी एखादे प्लान्ट भेट म्हणून देऊ शकता. किंवा परफ्युम्ड सॅचे मिळतात. ते त्यांना भेट म्हणून द्या. त्याचा नैसर्गिक सुगंध त्यांना कामाच्या ठिकाणी उत्साही ठेवेल.  



डायरी 


डायरी हे अगदीच टिपिकल गिफ्ट आहे. पण यंदा तिच ती सकारात्मक संदेश देणारी डायरी देऊ नका. हटके, आर्टिस्टिक आणि त्यांची कामं नीट नियोजित करता ये तील अशा क्रिएटीव्ह डायरीज त्यांना भेट द्या.  


इसेन्शिएल ऑईल 


सुवासिक वास येणारे ऑर्गॅनिक ऑईल हा देखील नव्या वर्षाची सुरूवात करण्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. त्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना आवडीनुसार इसेंशिएल ऑईल भेट द्या.  


कप / मग 


ऑफिसच्या ठिकाणी कप किंवा मग द्या. त्यांना आवडी आणि सवडीनुसआर चहा, कॉफीची निवड करता येईल.