Unhealthy Periods Symptoms : मासिक पाळी (Menstrual Periods) ही प्रत्येक महिलेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. अजूनही आपल्या समाजाच खुलेपणाने पिरीयड्ससंदर्भात बोललं जात नाही. इतकंच नाही तर मासिक पाळीसंदर्भात अनेक प्रकारच्या गैरसमजुती देखील आहेत. अशामध्ये अनेक मुलींना किंवा बायकांना माहिती असते का की, हेल्दी पिरीयड्स म्हणजे नेमकं काय? याशिवाय पिरीयड्स सायकल, ब्लड कलर कसा असला पाहिजे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक तरूणींना याचं उत्तर देता येणार नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या लक्षणांद्वारे तुम्ही ओळखू शकता की, तुचमे पिरीयड्स हेल्दी आहेत. 


किती दिवसांची असते पिरीयड्स सायकल?


मासिक पाळी ही 26-35 दिवसांच्या कालावधीमध्ये आली पाहिजे. जर मासिक पाळी येण्यासाठी 4-5 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तुम्हाला 26 दिवस पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा मासिक पाळी आली तर याचा अर्थ तुमच्या हार्मोन्समध्ये गडबड झाल्याची लक्षण आहे.


पिरीयड्स फ्लोमध्ये रक्ताच्या गुठळ्या दिसणं


पिरीयड्सच्या काळामध्ये जर तुम्हाला ब्लड क्लॉट म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या दिसून येत असतील तर हे अनहेल्दी पिरीयड्सचं लक्षण आहे. इतकंच नव्हे तर तुमच्या रक्ताचा रंग गडद लाल असेल तरीही ते अनहेल्दी पिरीयड्स मानले जातात. 


 



मासिक पाळीमध्ये वेदना होणं


अनेकदा मुलींना असं सांगितलं जातं की, मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना या सामान्य आहेत. मात्र हे चूक आहे. खरं म्हणजे मासिक पाळीपूर्वी किंवा मासिक पाळी सुरू असताना पाय, पाठ किंवा पोटात दुखणं सामान्य नाही. या वेदनांकडे एकदा दुर्लक्ष करू नये. जर त्रास अधिकच होत असेल तर तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा.


PMS ची लक्षणं दिसणं


मासिक पाळीवेळी जर महिलांना पीएमएस म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणं जाणवत असतील तर हे देखील अनहेल्दी पिरीयड्सचं लक्षण आहे. काही महिलांना मासिक पाळीच्या 1-2 आठवड्यांपूर्वी मूड स्विंग, चिडचिड, डोकेदुखी यांसारख्या समस्या दिसून येतात. या तक्रारी हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांनी होतात.