Vaginal darkening : Vaginal Area च्या काळेपणामुळे अनेक महिला त्रस्त असतात. योनीमार्गाजवळ असलेला काळेपणा दूर करण्यासाठी (how to lighten dark private parts naturally) महिला अनेकदा गुगलचा देखील वापर करतात. जर तुम्ही यावर एखादी त्वचेची समस्या म्हणून उपचार करत असाल तर थांबा. आज आम्ही तुम्हाला याची कारण सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योनीमार्गाजवळ म्हणजे Vaginal Area जवळ महिलांना असलेली काळेपणाची समस्या ही हार्मोनल हेल्थ, लठ्ठपणा आणि सारखेच्या सेवनाशी संबंधित असू शकते. मुख्य म्हणजे यामागे अनेक कारणं आहेत, याची माहिती घेऊया.


या कारणांमुळे वजायनल एरिया काळा पडतो (Causes of Vaginal darkening)


एस्ट्रोजेन (estrogen) च्या पातळीमध्ये बदल झाला की वजायनल एरिका काळा पडतो. एस्ट्रोजेन मेलेनिनच्या उत्पादनावर परिणाम करू शकतं, ज्यामुळे लॅबिया किंवा स्तनाग्र यांसारख्या संवेदनशील भागा देखील गडद होऊ लागतात. जेव्हा शरीरात हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळी योनीमार्गाचा भागावर गडद डाग दिसू शकतात. मात्र याशिवाय याची अनेक कारणं आहेत.


  • मधुमेब किंवा साखरेचं अधिक प्रमाणात सेवन

  • त्वचेच्या इन्फेक्शनमुळे

  • वॅक्स केल्याने

  • लठ्ठपणा

  • गरोदरपणात

  • मेनोपॉमुळे देखील


योनीमार्गाचा काळेपणा कसा दूर कराल


दह्याचा वापर 


वजायनल एरियासाठी दही खूप फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये व्हिटॅमीन सी असतं, ज्यामुळे स्किन पिग्मेंटेशन कमी होऊन रंग उजळण्यास मदत होते. याशिवाय हे अंटीबॅक्टेरियल आणि एंटीफंगल देखील असतं. दह्यामुळे वजानल इन्फेक्शन कमी होण्यासही मदत होते. अंघोळीपूर्वी वजायनल एरियाला दही लावावं आणि 20 मिनिटांनंतर नॉर्मल वॉश करा.


एलोवेरा जेल लावा


या समस्येसाठी एलोवेरा जेल प्रभावीपणे काम करतं. एलोवेरा जेल योनीच्या पीएचनुसार योग्य आहे. या शिवाय ते अँटीफंगल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस रोखण्यास मदत करतं. मुख्य म्हणजे यामुळे काळेपणा कमी होतो. त्यामुळे, दह्याप्रमाणेच आंघोळ करण्यापूर्वी या भागात जेल लावा.


गुलाब पाणी आणि चंदन लावा (Sandalwood gulab jal paste)


गुलाबाचं पाणी आणि चंदन दोन्ही एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट महिलांनी योनीमार्गाभोवती लावावी. फक्त 10 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. असं तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करा. याचा परिणाम हळूहळू दिसू लागेल.