मुंबई : प्रेमाचा महिना सुरू झाला आहे. काही दिवसांवर आलेल्या व्हेलंटाईन डे ला आपल्या गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचे या विचारात तरूणाई असेल. चॉकलेट, रोजेस, गिफ्ट कार्ड या नेहमीच्या टिपिकल गिफ्टऐवजी ही हटके गिफ्ट्स तिला नक्कीच खूश करतील. बघा मग ट्राय करून...


डिजिटल बॉडी वेट मशीन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुली आपल्या फिगरबद्दल अत्यंत जागरुक असतात. वजन वाढू नये म्हणून काय काय करतात. अनेकदा मी जाड तर दिसत नाही ना? असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. अशावेळी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून डिजिटल बॉडी वेट मशीन खरेदी करुन गिफ्ट करु शकता. याची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते.


स्मार्टवॉच


मुलींना घड्याळं खूप आवडतात. आणि जर तुमच्या गर्लफ्रेंडला गॅजेटबद्दल आवड असेल तर तुम्ही स्मार्टवॉच गिफ्ट करु शकता. स्मार्टवॉच तुम्हाला १ हजारापासून ३५ हजारापर्यंतच्या रेंजमध्ये मिळतील.


पॉवरबॅंक


आजकालची तरुणाई स्मार्टफोनपासून मिनिटभरही दूर राहू शकत नाही. मात्र स्मार्टफोन सातत्याने वापरायला तो चार्ज असणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे पॉवरबॅंक. तुम्हाला ७०० ते १५०० पर्यंत तुम्हाला ११००० ते २०००० एमएच च्या पॉवरबॅंक मिळतील. याचा इमरजेंसीमध्येही उपयोग होईल.


इंस्टेंट कॅमेरा


सेल्फी आणि मुली यांचे नाते वेगळे सांगण्याची गरज नाही. दिवसभरात किती सेल्फी काढत असतील याचा अंदाज आपल्याला येणार नाही. अशावेळी जर तुम्ही इंस्टेंट कॅमेरा त्यांना गिफ्ट केलात तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल.


की फायंडर


आपल्या फोनबद्दल अत्यंत पेजेसिव्ह असलेल्या मुली फोन जरा नजरेआड झाला तरी आरडाओरड करतात. काहीजणी तर मोबाईल चक्क विसरतात. अशावेळी की फायंडर त्यांचा मदतीला धावून येईल. यामुळे तुम्ही स्मार्टफोन, चावी यांसारख्या सापडत नसलेल्या गोष्टी शोधू शकाल. मात्र यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागेल कारण याची किंमत आहे ८ हजार रुपये.


फिटनेस बॅँड


आपल्या आरोग्याबाबत जागरुक असलेल्या मुलींना गिफ्ट करण्यासाठी हा अत्यंत उत्तम उपाय आहे. याची किंमत १५०० रुपये आहे.


मोबाईल केस


रंगीबेरंगी क्रिस्टलचे मोबाईल कव्हर्स मुलींना खूप आवडतात. मग मोबाईल कव्हर देऊन तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला खूश करू शकता.