मुंबई : गेल्या एक आठवड्यापासून वेगवेगळे डे तरूणाई साजरी करत आहे. पण हे डेज साजरे करताना त्यांना सर्वात जास्त उत्सुकता लागलेली असते ती व्हॅलेंटाईन डे ची. 


प्रश्नांचा भडीमार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवसाची तरूणाई वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. त्यासाठी वेगवेगळी तयारी करीत असतात. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर केलेलं असतं. अनेकांना त्यांच्या मनातील प्रेम व्यक्त कसं करायचं, असा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे अशाच काहींसाठी आम्ही प्रपोज कसा करायचा याच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत.


मनात धाकधुक


नेमका मार्ग मात्र अनेकांना गवसत नाही. आधीच मनात धाकधुक आणि त्यात प्रपोज कसं करायचं याचं प्लॅनिंग यातच कितीतरी वेळ जातो. पण पहिल्यांदा केलेला प्रपोज हा खूप स्पेशल असला पाहिजे, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं. त्यामुळे प्रपोज हे फेल जायला नको म्हणून त्याच्या काही खास टीप्स जाणून घेणंही तितकच महत्वाचं आहे. नाहीतर सगळंच फिस्कटण्याची शक्यता अधिक असते.


प्रपोज करणं सोपं नाही


सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे ती १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची. याच दिवशी अनेक प्रेमी त्यांच्या मनातील भावनांना मोकळे करतात. त्यांच्या प्रिय व्यक्तींना ते सगळं काही सांगून टाकतात. पण हे मनातलं हे सगळंकाही सांगून टाकणं वाटतं तितकं सोपं नसतं. कुणालाही सल्ला देणं सोपं आहे, पण ती गोष्ट प्रत्यक्षात करणं हे त्याहून कठिण. पण तरीही थोडीशी मदत म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रपोज करण्याच्या काही खास आणि वेगळ्या टिप्स घेऊन आलो आहोत. याचा तुम्हाला नक्कीच थोडातरी फायदा होईल.