मुंबई : ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच ‘वटपौर्णिमा. सावित्रीने यमधर्माशी चातुर्याने तत्त्वचर्चा करून आपल्या पतीचा म्हणजेच सत्यवानाचा प्राण परत आणला. शास्त्रातील या कथेचा आधार घेऊन भारतीय स्त्रिया आपल्या पतीच्या  दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करतात व दिवसभर  उपवास करतात. मात्र आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत आधुनिक स्त्रियांना हे सारे करणे शक्य नसते. म्हणूनच त्यावर तोडगा काढण्यासाठी वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा केली जाते. मात्र यामुळे सणाचा मूळ हेतू तर दूरच राहतो उलट वटवृक्षांची छाटणी केल्याने वातावरणातील वायुप्रदुषणही वाढते.


मग यंदा कशी कराल वटपौर्णिमा साजरी ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वड हे चिरतरूण झाड आहे. अक्षय म्हणजेच नाश न होणारे वडाचे झाड दीर्घायुषी असते. म्हणूनच आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच नवीन वटवृक्षाची झाडे लावण्याचा प्रयत्न करा.


सामान्यतः झाडं दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन-डायऑक्साईड सोडतात. मात्र वडाच्या झाडांतून रात्रीदेखील प्राणवायूचाच पुरवठा होत असल्याने तुमच्या परिसरात वटवृक्षाचे झाड असणे हे आरोग्यास हितकारी आहे. म्हणूनच वडाच्या झाडांचे रोपण केल्यास तुमच्या पतीसोबतच परिवारातील इतर व्यक्तींचेही आरोग्य सुधारेल.


वडाचे औषधी गुणधर्म 


निसर्ग सारेच मुक्तहस्ताने देत असतो मात्र ते मनुष्याला योग्यरित्या  स्विकारण्याची गरज आहे. वडात औषधी गुणधर्म असल्याने शास्त्राप्रमाणेच आयुर्वेदातही या वृक्षाचे फार महत्त्व आहे. अनेक औषधांमध्ये वडाचा समावेश केला गेला आहे.


वडापासून बनवल्या जाणार्‍या तेलामुळे केसांचे आरोग्य सुधारते. सोबतच महिल्यांच्या आरोग्यासाठीदेखीलवड हे झाड अत्यंत फायदेशीर आहे.