मुंबई : लाल रंगाचा कोट घातल्यावर तुम्हाला कधी वेगळं काही जाणवलंय का? डेटिंग एक्सपर्टच्या मते लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिला अधिक आकर्षक दिसतात. यासोबतच त्यांचा असाही दावा आहे की लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिलांना त्यांचा लव्ह पार्टनर मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे खरे आहे का? या विषयावर उत्तर जाणून घेण्यासाठी लंडनचे लाईफस्टाईल एडिटर आणि लेखक यांनी स्वत: लाल रंगाचा कोट घालून पूर्ण दिवस बाहेर घालवला. 


यावेळी दिवसभरात लोकांनी त्यांना चांगल्या कमेंट्स दिल्या. इतर रंगाचे कपडे घातल्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या कमेंट कधी मिळाल्या नव्हत्या. काही व्यक्तींनी त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केलीये.


यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे लाल रंग हा इतर रंगापेक्षा वेगळा दिसतो. या रंगाच्या कपड्यांमध्ये व्यक्ती अधिक आकर्षक आणि सुंदर दिसते. याशिवाय हा रंग त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक उजळतो. तसेच लाल रंगाचे कपडे घातल्याने लोक अधिक आकर्षित होतात.